Contact Banner

लेवा पाटीदार समाजाच्या इतिहासात सुवर्णक्षण; आमोद्याची कु. नंदिनी पाटील यांची UPSC मध्ये ऐतिहासिक झेप

 

leva-patidar-samaj-itihas-suvrnakshan-amodyachi-nandini-patil-upsc-aitihasik-yash

लेवा पाटीदार समाजाच्या इतिहासात सुवर्णक्षण; आमोद्याची कु. नंदिनी पाटील यांची UPSC मध्ये ऐतिहासिक झेप

लेवाजगत न्यूज | आमोदा (ता. यावल)
आमोदा येथील कु. नंदिनी संजीव पाटील यांनी UPSC परीक्षेत ऑल इंडिया रँक ५१२ मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे केवळ कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण लेवा पाटीदार समाजाचा गौरव वाढला आहे. विशेष म्हणजे, लेवा पाटीदार समाजातील UPSC परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या त्या पहिल्याच मुलगी ठरल्या असून, हा क्षण समाजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जात आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द, अथक परिश्रम आणि अढळ आत्मविश्वासाच्या जोरावर नंदिनी यांनी हे यश मिळवले आहे. त्यांचे वडील श्री. संजीव देविदास पाटील आणि आई सौ. शिल्पा संजीव पाटील (मूळ गाव आमोदे, ता. यावल) हे जळगाव येथे खाजगी क्लासेस चालवतात. शिक्षणनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि कष्टाचे संस्कार त्यांनी नंदिनी यांना दिले असून, तेच त्यांच्या यशामागचा भक्कम पाया ठरले.

लेवा पाटीदार समाज हा कष्टाळूपणा, शिस्त, शिक्षणनिष्ठा आणि प्रगतीशील विचारसरणीसाठी ओळखला जातो. शेतीपासून उद्योग, शिक्षण आणि प्रशासन क्षेत्रापर्यंत समाजाने आपली ठसा उमटवला आहे. नंदिनी पाटील यांनी या परंपरेला नवी उंची देत समाजाच्या कर्तृत्वाची छाप देशपातळीवर उमटवली आहे.

त्यांच्या या यशामुळे समाजातील तरुण-तरुणींना नवी प्रेरणा मिळाली असून, प्रत्येक घरातील स्वप्नांना नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. नंदिनी पाटील यांचा प्रवास हा जिद्द आणि मेहनतीचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

दरम्यान, जळगाव येथे आमदार श्री. सुरेश दामू भोळे यांच्या हस्ते कु. नंदिनी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी धनंजय भास्कर कोल्हे, उद्योजक किशोर ढाके, भरत खडके तसेच ज्ञानेश्वर भोळे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.