Contact Banner

श्रीरामचंद्र व श्री स्वामिनारायण भगवान प्रागट्य उत्सव सोहळा; सावद्यात भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

 

shriramchandra-shri-swaminarayan-bhagwan-pragatya-utsav-sohala-savdyat-bhavya-dharmik-karyakram-ayojan


श्रीरामचंद्र व श्री स्वामिनारायण भगवान प्रागट्य उत्सव सोहळा; सावद्यात भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन


सावदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) – श्री स्वामिनारायण मंदिर सावदा येथे गुरुवार दिनांक २६ चैत्र शुद्ध नवमी निमित्त श्री रामचंद्र भगवान प्रागट्य व श्री स्वामिनारायण भगवान प्रागट्य उत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दुपारी १२.०० वाजता श्रीराम प्रागट्य आरती होणार आहे. तसेच रात्री ८ ते १० या वेळेत धून, गरबा व भजनाचा कार्यक्रम रंगणार असून त्यानंतर रात्री १०.१० वाजता श्रीहरि (स्वामिनारायण भगवान) प्रागट्य आरती संपन्न होणार आहे.

सावदा येथील पुरातन असलेल्या या मंदिरात हा उत्सव गुरुवर्य शास्त्रीय धर्मप्रसाद दासजी यांच्या आशीर्वादाने गुरुवर्य शास्त्री वेदांत व्याकरणाचार्य भक्ती प्रकाश दासजी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन मंदिराचे कोठारी स्वयंप्रकाश दाजी, धर्म किशोर दासजी, विश्व प्रकाश दासजी यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. तसेच मंदिराचे पुजारी सत्यप्रकाश दासजी, माधव स्वामी व भक्तीप्रिय दासजी यांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक विधी पार पडणार आहेत.

या सोहळ्याचे आयोजन स्वामिनारायण सत्संग समाज, सावदा यांच्या वतीने करण्यात आले असून हरिभक्त व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.