Contact Banner

माहिती अधिकाराचा अर्ज टाकल्यावरुन पिळोदा येथे दोघांवर जिवघेणा हल्ला! "अमळनेर पोलिस ठाण्यात लतिफ खाटीक व शाहनवाज ऊर्फ गुड्डू खाटीक विरुद्ध गुन्हा दाखल"

 माहिती अधिकाराचा अर्ज टाकल्यावरुन पिळोदा येथे दोघांवर जिवघेणा हल्ला!


"अमळनेर पोलिस ठाण्यात लतिफ खाटीक व शाहनवाज ऊर्फ गुड्डू खाटीक विरुद्ध गुन्हा दाखल"


अमळनेर प्रतिनिधी :- पिळोदा येथे गैबान शाह दर्गे जवळ लतिफ खाटीक यांची चिकन मटन विक्रीची दुकान आहे.या दुकान जवळून मोकाट श्वान,मांजरे हे चिकन चे पर वगैरे आणून दर्गा व परिसरात टाकून देतात यामुळे अस्वच्छता पसरून दुर्गंधी निर्माण होत असते,तरी सदरील दुकान संदर्भात पिळोदा ग्रामपंचायत येथे समद शाह दगूशाह यांनी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दिल्याचा राग मनात ठेवून दि.११ मार्च २०२६ रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या दरम्यान लतिफ इमाम खाटीक यांनी(आरटीआय)अर्जदार समद शाह दगूशाह याच्याशी वाद घालून त्यांना मारहाण करीत होते.मोबाईलमध्ये छायाचित्र काढत होते.हे पाहून शहानवाज उर्फ गुड्डू लतीफ खाटीक याला राग आला.शाहारुक"तुझ्या वडिलांनी माहितीचा अधिकार टाकला आहे,तुम्हाला मारून टाकू," अशी धमकी देत त्याने लोखंडी रॉडने शाहारुक त्यांच्या डाव्या हातावर मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.तसेच ते खाली पडल्यावर लतिफ खाटीक यांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.भांडण सोडवण्यासाठी काका अरमानशहा दगुशाह फकीर आले असता त्यांच्या कपाळावरही लोखंडी रॉडने मारण्यात आल्याचे नमूद आहे. या प्रकरणी शाहनवाज उर्फ गुड्डू लतिफ खाटीक व लतिफ इमाम खाटीक विरुद्ध सदर प्रकरणी शाहरुख शाह समदशाह यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात बीएनएस २०२३ च्या कलम ११८(१),११५(२),३५२,३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.