Contact Banner

नवी मुंबई विमानतळावरून ४६ शहरांसाठी उड्डाणे

navi-mumbai-vimanatalavarun-46-shaharansathi-uddaane


 नवी मुंबई विमानतळावरून ४६ शहरांसाठी उड्डाणे.


उरण :सुनिल ठाकूर -नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या उन्हाळी वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली असून, २९ मार्च ते २४ ऑक्टोबर या कालावधीत तब्बल ४६ शहरांसाठी थेट उड्डाणे सुरू होणार आहेत. या निर्णयामुळे नवी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या दळणवळण सुविधेत मोठी भर पडणार आहे.


नव्या वेळापत्रकात ३० नवीन मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना देशातील प्रमुख शहरांमध्ये अधिक वेगवान आणि थेट प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे

 विशेषतः दिल्ली, गोवा, बेंगळुरू आणि कोचिन या शहरांसाठी सर्वाधिक उड्डाणे नियोजित आहेत. याशिवाय हैद्राबाद, कोलकाता, लखनौ, वाराणसी आणि इंदूर या शहरांनाही नियमित सेवा मिळणार आहे. या विस्तारासाठी इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या प्रमुख विमान कंपन्या अतिरिक्त उड्डाणे चालवणार आहेत.

 आठवड्याला १,०९२ उड्डाणे


उन्हाळी वेळापत्रक लागू झाल्यानंतर विमानतळावरील उड्डाणांची संख्या लक्षणीयरीत्या वाढणार आहे. आठवड्याला सुमारे १,०९२ उड्डाणे अपेक्षित असून, दररोज सरासरी १५६ उड्डाणे होतील.


सुरुवातीला दररोज २२ उड्डाणांपासून सुरू झालेली सेवा एप्रिल २०२६ पर्यंत वाढून ७८ उड्डाणांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे विमानतळाची कार्यक्षमता आणि प्रवासी हाताळण्याची क्षमता अधिक बळकट होईल. टियर-१ आणि टियर-२ शहरांशी थेट कनेक्टिव्हिटी वाढल्याने उद्योग, पर्यटन आणि व्यवसाय क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


२९ मार्च ते २४ ऑक्टोबर दरम्यानचे वेळापत्रकाची वैशिष्ट्ये ४६ शहरांसाठी थेट उड्डाणे, ३० नवीन मार्गाचा समावेश, १५६ दररोज सरासरी उड्डाणे, १,०९२ आठवड्याला उड्डाणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.