Contact Banner

पुणे रावेर एसटी बसचा फुलंब्रीजवळ अपघात; ३ जखमी, २२ प्रवाशी बचावले

 

pune-raver-st-bus-accident-fulambri-javal-3-jakhmi-22-pravashi-bachavle

पुणे रावेर एसटी बसचा फुलंब्रीजवळ अपघात; ३ जखमी, २२ प्रवाशी बचावले

लेवाजगत न्यूज प्रतिनिधी रावेर-पुणे येथून रावेरकडे येणाऱ्या रावेर आगाराच्या एसटी बसला फुलंब्रीजवळ मध्यरात्री अपघात झाल्याची घटना घडली. ही घटना आज पहाटे सुमारे २:४५ वाजेच्या सुमारास घडली असून, अपघातात ३ प्रवासी जखमी झाले आहेत. तर बसमधील इतर २२ प्रवाशी थोडक्यात बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर आगाराची (क्र. MH-09-FL-0468) बस पुण्यावरून रावेरकडे येत होती. फुलंब्रीजवळील हॉटेल साईप्रसादसमोर मठ पाटीजवळ बस आली असता, वाहक बाजूने जाणाऱ्या एका स्कूल बसच्या चालकाने अचानक उजवीकडे वळण घेतले. या वेळी अपघात टाळण्याच्या प्रयत्नात बसचालक सचिन बागूल यांनी बस वळवली; मात्र त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरील डिव्हायडरला धडकली.

या अपघातात योगेश रघुनाथ जोशी, यशोदाबाई विश्वनाथ कुमावत आणि मोहम्मद मोसिन हे तीन प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने इतर २२ प्रवाशी सुरक्षित बचावले.

घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात बसचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.