Contact Banner

सावदा सहकारी दूध उत्पादक संस्थेत दारू विक्रीचा पर्दाफाश; पोलिसांची छापेमार कारवाई

 

savda-sahakari-dudh-utpadak-sansthet-daru-vikrichya-pardafash-polisancha-chhapemar-karvai


सावदा सहकारी दूध उत्पादक संस्थेत दारू विक्रीचा पर्दाफाश; पोलिसांची छापेमार कारवाई

लेवाजगत न्यूज सावदा : शहरातील सहकारी दूध उत्पादक संस्थेमध्ये बेकायदेशीरपणे विदेशी दारू विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून सावदा पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे.


व्हिडीओ बघा- 👇दूध डेअरीतून विदेशी दारू जप्त; सावदा पोलिसांची कारवाई

https://youtu.be/m4C6LgG29J4


आज (दि. 25 मार्च 2026) रोजी सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, सावदा येथील सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या मागील खोलीत एक इसम विदेशी दारू विक्रीसाठी साठवून ठेवत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांसमक्ष छापा टाकला.

छाप्यामध्ये डेअरीच्या किचन रूममध्ये ठेवलेल्या एका बॉक्समधून 750 एमएलच्या 9 सिलबंद विदेशी दारूच्या बाटल्या, अंदाजे 13,500 रुपयांच्या किमतीच्या, जप्त करण्यात आल्या.

या प्रकरणात संस्थेतील क्लर्क नितीन रामकृष्ण बेंडाळे (वय 46, रा. सावदा, ता. रावेर) याने विक्रीसाठी दारू आणल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 76/2026 नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ उमेश पाटील करत आहेत. तसेच या अवैध दारू विक्रीमध्ये संस्थेच्या संचालक मंडळाचा काही सहभाग आहे का, याचाही सखोल तपास सुरू आहे.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल पाटील, पोउनि अमोल गर्जे, पोहेकॉ उमेश पाटील, पोना जाकीर मन्सुरी आणि पोकॉ मयूर पाटील यांनी संयुक्तरित्या केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.