Contact Banner

श्री स्वामिनारायण मंदिर, सावदा येथे अक्षय तृतीयेनिमित्त सामूहिक ‘घागर भरण’ सोहळ्याचे आयोजन

shri-swaminarayan-mandir-savda-akshay-tritiya-samuhik-ghagar-bharan-sohala-ayojan


श्री स्वामिनारायण मंदिर, सावदा येथे अक्षय तृतीयेनिमित्त सामूहिक ‘घागर भरण’ सोहळ्याचे आयोजन

सावदा | लेवाजगत न्यूज प्रतिनिधी :
अक्षय तृतीयेच्या पावन पर्वानिमित्त सावदा येथील श्री स्वामिनारायण मंदिरात सामूहिक “घागर भरण” या पारंपरिक धार्मिक सोहळ्याचे सालाबादाप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे.

सनातन हिंदू संस्कृतीत अक्षय तृतीया हा अत्यंत पवित्र सण मानला जातो. या दिवशी आपल्या पितरांच्या स्मरणार्थ ‘घागर भरणे’ ही परंपरा प्रचलित असून, त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी व त्यांच्या आशीर्वादाची प्राप्ती व्हावी, अशी श्रद्धा असते.

अनेकदा विविध कारणांमुळे घरी हा विधी करणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन सावदा येथील श्री स्वामिनारायण मंदिरातच सामूहिक “घागरभरणी” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी विधीपूर्वक पूजा, होम तसेच पितरांच्या नावाने घागर भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांनी नाव नोंदणी करताना पितरांचे पूर्ण नाव व गोत्र देणे आवश्यक आहे. या उपक्रमासाठी ३५१ रुपये शुल्क ठेवण्यात आले असून, शुल्क मंदिराचे पुजारी सत्यप्रकाश दासजी यांच्याकडे जमा करून रीतसर पावती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (संपर्क : ७७५७८७३३७६)

या कार्यक्रमासाठी विविध पूज्य संतांचे मार्गदर्शन लाभणार असून, परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिराचे कोठारी स्वयंप्रकाश दासजी व आयोजकांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.