Contact Banner

भाजपकडून महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा

 

BJP announces names for five council seats, one bypoll

भाजपकडून महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील विधान परिषद द्वैवार्षिक निवडणूक २०२६ तसेच पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. यासंदर्भातील अधिकृत प्रसिद्धीपत्रक भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून मंगळवारी जारी करण्यात आले.

महाराष्ट्र विधान परिषद द्वैवार्षिक निवडणूक २०२६ साठी भाजपने पाच उमेदवारांना संधी दिली आहे. यामध्ये श्री सुनील विनायक करजतकर, श्रीमती माधवी नाईक, श्री संजय नत्थुजी भेंडे, श्री विवेक बिपीनदादा कोल्हे आणि श्री प्रमोद शांताराम जठार यांचा समावेश आहे.

तसेच विधान परिषद पोटनिवडणूक २०२६ साठी महाराष्ट्रातून डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या पत्रकावर राष्ट्रीय महासचिव तथा मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांची स्वाक्षरी आहे. या घोषणेनंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.