मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव विमानतळावर आगमन; प्रशासनाकडून स्वागत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव विमानतळावर आगमन; प्रशासनाकडून स्वागत
लेवाजगत न्यूज जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज शिरपूर येथून जळगाव विमानतळावर आगमन झाले.
मुख्यमंत्र्यांच्या आगमनावेळी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे विमानतळ परिसरात प्रशासनाने आवश्यक ती व्यवस्था केली होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत