चाक निखळल्याने क्रूझर उलटली; नवरीसह अकोल्याच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू,धरणगावजवळ भीषण अपघात:
चाक निखळल्याने क्रूझर उलटली; नवरीसह अकोल्याच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू,धरणगावजवळ भीषण अपघात:
लेवाजगत न्यूज धरणगाव-
लग्नाचा आनंद साजरा करून माहेरी परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला आहे. धरणगाव तालुक्यातील वरड गावाजवळ बुधवार, २८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात नवनवधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये अकोल्यातील वागडकर कुटुंबातील सदस्यांचा समावेश असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील रहिवासी पूजा रवी वागडकर (वय २२) हिचा विवाह नुकताच गुजरात राज्यातील वापी येथे पार पडला होता. लग्नानंतर ती आपल्या नातेवाईकांसह पहिल्यांदाच माहेरी अकोल्याला परतत होती. ताशी वेग जास्त असलेल्या क्रूझर गाडीचे (क्रमांक MH 30 AZ 4710) एक चाक अचानक निखळले. वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी होऊन हा भीषण अपघात झाला.
मृतांची नावे-या अपघातात खालील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला .पूजा रवी वागडकर** (वय २२, नवनवधू) दत्तू तुळशीराम भागवत** (वय ४२),जगदीश चंद्रभान वागडकर(वय ५२)
सहा जण गंभीर जखमी:
गाडीतील अन्य ६ प्रवासी या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये प्रेम भारत वाकडकर (वय २४), नितेश सुरेश काठोडे (वय ३५), अमोल दामोदर गीते (वय ३५), रवी प्रभाकर वाघोडकर (वय ३२), तुळशीराम भीमराव भागवत (वय ६७) आणि १४ वर्षीय बालक अंश नितेश काठोडे यांचा समावेश आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेऊन जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत