Contact Banner

सुप्रीम कोर्टाकडून माजी महापौर ललित कोल्हे यांना जामीन मंजूर; कुटुंबीयांना दिलासा

supreme-court-grants-bail-former-mayor-lalit-kolhe-family-relief


 सुप्रीम कोर्टाकडून माजी महापौर ललित कोल्हे यांना जामीन मंजूर; कुटुंबीयांना दिलासा

लेवाजगत न्यूज जळगाव (प्रतिनिधी) : बनावट कॉल सेंटर प्रकरणात अटकेत असलेले जळगावचे माजी महापौर ललित विजय कोल्हे यांना सर्वोच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे कोल्हे कुटुंबीयांसह त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद रोडवरील एल. के. फर्म येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात बनावट कॉल सेंटर चालवले जात असल्याचे समोर आले होते. या माध्यमातून परदेशी नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात जागेचे मालक ललित कोल्हे यांच्यासह इतरांनाही अटक करण्यात आली होती.

दरम्यान, जळगाव जिल्हा व सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयात दाखल केलेले त्यांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यानंतर कोल्हे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आज त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

याआधीच जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत कोल्हे यांनी विजय मिळवला होता. आता जामीन मंजूर झाल्यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला असून, कुटुंबीय आणि समर्थकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.