Contact Banner

फैजपूरमध्ये धाडसी चोरी; 100 गॅस सिलिंडर लंपास

 

faizpur-gas-cylinder-theft-100-cylinders-stolen-jalgaon

फैजपूरमध्ये धाडसी चोरी; 100 गॅस सिलिंडर लंपास

लेवाजगत न्यूज फैजपूर : शहराजवळील पिंपरुड रोड परिसरात असलेल्या ‘श्रीधर गॅस एजन्सी’च्या गोदामात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाड टाकत तब्बल 100 भरलेले गॅस सिलिंडर लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही चोरी शनिवारी पहाटे समोर आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी एजन्सीचे कर्मचारी व संचालकांनी गोदाम बंद केले होते. त्या वेळी गोदामात एकूण 209 भरलेले सिलिंडर साठवलेले होते. शनिवारी सकाळी कर्मचारी गोदाम उघडण्यासाठी आले असता मुख्य गेटचे कुलूप तुटलेले आढळले. आत पाहणी केल्यानंतर तब्बल 100 सिलिंडर चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.

चोरी गेलेल्या प्रत्येक सिलिंडरची किंमत सुमारे 3,118 रुपये असून एकूण सुमारे 3 लाख 11 हजार 800 रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. चोरट्यांनी मोठ्या वाहनाचा वापर करून ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सध्या देशभरात गॅस टंचाईचे सावट असल्याने नागरिकांना सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अशा परिस्थितीत ही चोरी झाल्याने परिसरात गॅस तुटवडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या प्रकरणी गोदाम मालक ललित रघुनाथ राणे यांनी येथे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.