Contact Banner

स्पंदन २०२६ युवा महोत्सवात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

 

spandan-2026-yuva-mahotsav-godavari-college-nursing-jalgaon-success

स्पंदन २०२६ युवा महोत्सवात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

लेवाजगत न्यूज | जळगाव | दि. २५ एप्रिल २०२६

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने दि. २३ ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव ‘स्पंदन २०२६’ मध्ये गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या नावात मानाचा तुरा रोवला.

स्पॉट पेंटिंग स्पर्धेत (बीएस्सी नर्सिंग ८ वे सत्र) ऋतु भिलावेकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला. कार्टूनिंग स्पर्धेत वैष्णवी वाघमारे (बीएस्सी नर्सिंग ७ वे सत्र) हिने तृतीय क्रमांक मिळवला. रांगोळी स्पर्धेत रजनींदिनी चव्हाण (बीएस्सी नर्सिंग ८ वे सत्र) हिने द्वितीय क्रमांक पटकावला, तर स्पॉट फोटोग्राफी स्पर्धेत दिग्विजय बडे (बीएस्सी नर्सिंग ७ वे सत्र) याने तृतीय क्रमांक मिळवला.

इन्स्टॉलेशन स्पर्धेत (समूह सहभाग) बीएस्सी नर्सिंग ७ व ८ सत्रातील विद्यार्थ्यांनी एकत्रित सहभाग नोंदवत द्वितीय क्रमांक मिळवून ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या गटात समीक्षा जवाडे, कल्याणी शहाणे, नम्रता घोडमारे आणि विकास जाधव यांचा समावेश होता.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, प्राचार्य डॉ. विशाखा गणवीर, उपप्राचार्य जस्मित दया, प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.