Contact Banner

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात ि डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात

godavari-abhiyantriki-tantraniketan-mahavidyalayat-dipex-talk-2k26-utsahat


गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात ि  डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात

लेवाजगत न्यूज जळगाव — गोदावरी फाउंडेशन संचलित (स्वायत्त व नॅक मानांकित) गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय, जळगाव येथे डिपेक्स टॉक २ के २६ कार्यक्रमाचे अनुशासित व प्रगतशील विद्यार्थी संघटना ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ यांच्या सहकार्याने पार पडला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वरुणराज नन्नवरे, ( एबीव्हीपी देवगिरी प्रांत प्रदेश मंत्री), कल्याण दाणी, (डायरेक्टर, राम अँटीव्हायरस प्रा. लि.),डॉ. विजयकुमार पाटील, प्राचार्य, गोदावरी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालय, जळगाव,प्रा. डॉ. हेमंत इंगळे (डीन इनोव्हेशन), प्रा. दीपक झांबरे, डिप्लोमा कोऑर्डिनेटर (तंत्रनिकेतन), प्रा. नितीन पाटील डीन अकॅडेमिक (तंत्रनिकेतन), प्रा. अमिता महाजन विभाग प्रमुख संगणक अभियांत्रिकी, प्रा.नीलिमा पाटील विभाग प्रमुख आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, प्रा. प्रसाद मराठे विभाग प्रमुख यंत्र अभियांत्रिकी, प्रा. राजश्री खडके विभाग प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, प्रा. लीना चौधरी, प्रा. रोहिणी डवले, तसेच प्रा. दीपेश भुसे विभाग प्रमुख बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज यांच्यासह प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

नन्नवरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात विद्यार्थी संघटनांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. कल्याण दाणी, (डायरेक्टर, राम अँटीव्हायरस प्रा. लि.), यांनी सायबर सुरक्षा, तंत्रज्ञान आणि आधुनिक करिअर संधी याविषयी सखोल माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.  डॉ. विजयकुमार पाटील, विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांत सक्रिय सहभाग घेऊन आपली कौशल्ये विकसित करावीत, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे विद्यार्थी परिषद प्रतिनिधी प्रणव कंवर, यश बोंडे, मोहित चौधरी व रोहित कोळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतीक्षा सोनवणे यांनी केले.सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील  (सचिव), डॉ. केतकी पाटील  (सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील  यांनी कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.