Contact Banner

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात एआय प्रोटोटाईप डेमो डे; स्मार्ट व्होटिंग सिस्टीम ठरली अव्वल

godavari-engineering-college-jalgaon-ai-prototype-demo-day-smart-voting-system-winner


गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात एआय प्रोटोटाईप डेमो डे; स्मार्ट व्होटिंग सिस्टीम ठरली अव्वल

लेवाजगत न्यूज जळगाव :-गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्स अभियांत्रिकी विभागातर्फे ‘एआय प्रोटोटाईप डेमो डे’ उत्साहात पार पडला. हा उपक्रम संस्थेच्या इनोव्हेशन कौन्सिल अंतर्गत आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात तृतीय वर्ष एआयडीएस शाखेतील विद्यार्थ्यांनी विविध अभिनव प्रकल्प सादर करत आपल्या तांत्रिक कौशल्यांची प्रभावी झलक दाखवली. अनेक प्रकल्पांनी वास्तविक जीवनातील समस्यांवर उपयुक्त उपाय सुचवले.

स्पर्धेत प्रथम क्रमांक सत्यम महाजन यांच्या ‘एआय बेस स्मार्ट व्होटिंग सिस्टीम’ या प्रकल्पाने पटकावला. या प्रणालीद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने मतदान प्रक्रिया अधिक सुरक्षित, जलद आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला आहे. फेस रिकग्निशन व ओटीपीच्या माध्यमातून मतदारांची अचूक ओळख, बनावट मतदानाला आळा, तसेच रिअल-टाइम अॅनालिटिक्सद्वारे निकालांचे अंदाज देण्याची सुविधा या प्रणालीत उपलब्ध आहे.

द्वितीय क्रमांक हर्षा धांडे, मिनाज पिंजारी, तरन्नुम पिंजारी आणि एफ़ाज खाटीक यांच्या ‘एआय न्यूज अॅप्लीकेशन’ला मिळाला. या अॅपद्वारे वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीनुसार ताज्या व विश्वसनीय बातम्या एआयच्या मदतीने फिल्टर करून दिल्या जातात.

तृतीय क्रमांक आकाश जाधव व तेजस जाधव यांच्या ‘एआय बेस रिझ्युम स्क्रिनिंग सिस्टीम’ प्रकल्पाला मिळाला. या प्रणालीमुळे कंपन्यांना मोठ्या प्रमाणातील रिझ्युममधून योग्य उमेदवारांची निवड जलद व अचूकपणे करता येते.

इतर विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट प्रकल्प सादर करून आपली नवोपक्रम क्षमता दाखवून दिली. सादर प्रकल्पांचे प्राध्यापक व तज्ज्ञांनी कौतुक केले.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी यांचे मार्गदर्शन लाभले. विभागप्रमुख डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. जयश्री पाटील असून, प्रा. रेश्मा अत्तरदे, प्रा. सेजल गुजराथी व प्रा. दिशा साळुंके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या उपक्रमाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, तसेच डॉ. वैभव पाटील व डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या यशस्वी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम, संशोधन व उद्योजकतेची भावना अधिक दृढ झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.