लेवा बोर्डिंगमध्ये आजपासून भव्य प्रदर्शन व मेळावा; मानसी जोशी यांचे मार्गदर्शन व विशेष सवलत
लेवा बोर्डिंगमध्ये आजपासून भव्य प्रदर्शन व मेळावा; मानसी जोशी यांचे मार्गदर्शन व विशेष सवलत
लेवाजगत न्यूज जळगाव – विश्वशांती समूहाच्या वतीने चैत्र महोत्सव २०२६ निमित्त दोन दिवसीय भव्य प्रदर्शन व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दि. ११ व १२ एप्रिल रोजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत लेवा बोर्डिंग हॉल (नंदिनीबाई शाळेजवळ) येथे होणार आहे.
या मेळाव्यात नागरिकांना खरेदीसोबतच आनंददायी उत्सवाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार असून प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट मानसीस् रॉयल लुक ब्युटी पार्लरच्या मानसी जोशी यांच्याकडून मार्गदर्शन व विशेष सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
मेळाव्यात एकाच छताखाली विविध गृहपयोगी वस्तू उपलब्ध होणार आहेत. यामध्ये ज्वेलरी, कपडे, वाळवणी पदार्थ, पापड-लोणचे, शुद्ध तेल व तूप, पर्स, क्रिस्टल्स, कॉस्मेटिक्स आदींच्या स्टॉल्सचा समावेश आहे. घरगुती उत्पादनांपासून ते फॅशन व लाइफस्टाइल वस्तूंपर्यंत अनेक पर्याय येथे उपलब्ध राहणार आहेत.
मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे ब्युटी पार्लर सेवा तब्बल ५० टक्के सवलतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांसाठी हा मेळावा खास ठरणार आहे.
उत्तम दर्जाच्या वस्तू आकर्षक व परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. चैत्र महिन्याच्या उत्सवी वातावरणात कुटुंबासोबत खरेदी, स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद आणि आनंददायी वेळ घालवण्यासाठी हा मेळावा उपयुक्त ठरणार आहे.
या मेळाव्यात फॅमिली-फ्रेंडली वातावरण तयार करण्यात येणार असून सर्व वयोगटातील नागरिकांना आनंददायी अनुभव मिळेल, असे आयोजकांनी सांगितले. नागरिकांनी आपल्या कुटुंबीय व मित्रांसह या चैत्र महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन विश्वशांती समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत