Contact Banner

जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी; महादेव हॉस्पिटल सज्ज, १५ रुग्णांना लाभ

 

janarogya-yojana-implementation-mahadev-hospital-15-patients-benefited

जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी; महादेव हॉस्पिटल सज्ज, १५ रुग्णांना लाभ

जळगाव : शहरातील आकाशवाणी चौक परिसरातील महादेव हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. रुग्णसेवेसाठी हॉस्पिटल पूर्णपणे सज्ज झाले असून, पहिल्याच दिवशी १५ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे.

या उपक्रमामुळे जिल्हा व शहरातील रुग्णांना रात्री-अपरात्री उपचारासाठी भटकंती करावी लागणार नाही. महादेव हॉस्पिटल हे २४ तास सेवा देणारे सुसज्ज रुग्णालय असून येथे अत्याधुनिक यंत्रसामग्री, अनुभवी डॉक्टर आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी यांच्या माध्यमातून विविध आजारांवर उपचार केले जातात.

या योजनेअंतर्गत आता रुग्णांना स्पेशॅलिटी, सुपर स्पेशॅलिटी तसेच अतिदक्षता विभागात मोफत उपचार उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, योजनेबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर चौकशी होत असून, हॉस्पिटलला शेकडो फोन येत आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी रेशन कार्ड, आधार कार्ड किंवा आयुष्मान कार्ड यापैकी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

शासनाच्या या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना तातडीने आणि दर्जेदार उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, आरोग्य सेवेत एक सकारात्मक पाऊल म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.