Contact Banner

जयंतीनिमित्त स्व. गोदावरी आईंना वैद्यकीय महाविद्यालयात आदरांजली

 

jayantinimit-sw-godavari-ainna-vaidkiya-mahavidyalayat-adarajali

जयंतीनिमित्त स्व. गोदावरी आईंना वैद्यकीय महाविद्यालयात आदरांजली

लेवाजगत न्यूज जळगाव : येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात स्वर्गीय गोदावरी आई यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (१ एप्रिल) भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी त्यांच्या कार्याचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांच्या पावन स्मृतींना उजाळा दिला.

गोदावरी फाउंडेशनच्या प्रेरणास्थान असलेल्या स्व. गोदावरी आई यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुष्प अर्पण करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या समाजकार्याला वंदन करत त्यांच्या योगदानाचा गौरव केला.

या प्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. दीपक अग्रवाल, कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. अनुश्री अग्रवाल, डॉ. चंदन साबळे, डॉ. एम. डी. अब्दुल्ला, डॉ. अलोककुमार यादव, डॉ. रणधीर पांडे, डॉ. योगेश तायडे, डॉ. वैभव पालीवाल, डॉ. नीलेश बेंडाळे, डॉ. पंकजा बेंडाळे तसेच वरिष्ठ लिपिक अनंत इंगळे आणि कार्यालयातील सहकाऱ्यांनी स्व. गोदावरी आई यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.