खारघरमध्ये खानदेशी एकतेचा भव्य उत्सव; स्नेहमेळाव्यात मान्यवरांची मांदियाळी
खारघरमध्ये खानदेशी एकतेचा भव्य उत्सव; स्नेहमेळाव्यात मान्यवरांची मांदियाळी
लेवाजगत न्यूज | खारघर-खारघर येथील लेवा पाटीदार समाजगृहात खानदेशी स्नेहमेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. खानदेशी बांधवांच्या एकतेचा संदेश देणारा हा मेळावा मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुनील भिरुड, शामसुंदर पाटील, डॉ. भगवान जोगी, प्रकाश बाविस्कर, मधु पाटील, डॉ. आर. आर. दुमशुख, डॉ. दिलीप ससोडे, विकास पाटील, सतीश भंगाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
स्नेहमेळाव्याचा मुख्य उद्देश खानदेशी बांधवांना एकत्र आणून सामाजिक व व्यावसायिक नेटवर्क अधिक बळकट करणे हा होता. कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यां व खेळाडूंना गिरीश महाजन यांच्या हस्ते शाल व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
मेळाव्यात विविध स्टॉल्स उभारण्यात आले होते. त्यामध्ये खाद्यपदार्थ, खानदेशी उत्पादने, लेडीज परिधान, ज्वेलरी तसेच मार्गदर्शनपर स्टॉल्सचा समावेश होता. विशेष आकर्षण म्हणून खानदेशातील पारंपरिक खाद्यपदार्थांची मेजवानी उपस्थितांना देण्यात आली. भाळोद येथील विशेष पथकाने तयार केलेल्या केळीच्या पानावरील वरण-भात, भाकरी, भाजी, गुळाचा शिरा, तळलेली मिरची आणि मसाला भात यांचा आस्वाद उपस्थितांनी घेतला.
या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून समाज एकत्रीकरण, नेटवर्किंग तसेच भविष्यातील सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशवंत भांगळे, अमोल चौधरी, चंद्रकांत चिवंकर, जय भिवंडीकर, प्रशांत चौधरी, संदीप पाटील, सारिका चव्हाण, विनोद भोळे, कुलदीप पाटील, महेश शिरसाट, राहुल पाटील, तुलसीदास पाटील, जयश्री येवले, डॉ. सुहास खडसे, डॉ. सतीश विसपुते, डॉ. निलेश चिवंकर, मोहन महाजन, सागर फेगडे, स्वप्नील जोशी, डॉ. ईश्वरदास पाटील, डॉ. जितीन तळवे, डॉ. खिलचंद मंगळे, डॉ. उमेश शेळके आदींनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत