Contact Banner

सारीका चव्हाण यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; रेशनिंग दुकाने महिला बचतगटांना देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

 

sarika-chavan-demand-ration-shops-to-women-self-help-groups-jalgaon
सारीका चव्हाण यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; रेशनिंग दुकाने महिला बचतगटांना द्या

सारीका चव्हाण यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; रेशनिंग दुकाने महिला बचतगटांना देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

लेवाजगत न्यूज जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या महिला सशक्तीकरण धोरणाअंतर्गत रेशनिंग दुकाने महिला बचतगटांकडे चालविण्यास देण्यात यावीत, अशी मागणी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’च्या जिल्हा संयोजिका सारीका चव्हाण यांनी जिल्हाधिकारी रोहन धुगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

जळगाव जिल्ह्यातील रेशनिंग दुकानांची माहिती घेतली असता काही दुकानांचे परवाने तात्पुरते बंद असल्याचे, तसेच काही दुकाने मयत व्यक्तींच्या नावावर असून ती इतर रेशनिंग विक्रेत्यांना जोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. अशा बंद किंवा रद्द करण्यात आलेल्या रेशनिंग दुकानांचा महिला सशक्तीकरणासाठी उपयोग करून ती महिला बचतगटांना चालविण्यास देण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी रोहन धुगे यांच्याशी चर्चा करण्यात आली असता त्यांनी लवकरच शासन स्तरावर निर्णय घेऊन महिला सशक्तीकरण व सबलीकरणासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले. तसेच महिला बचतगटांना शासनाच्या नव्या योजनांची माहिती व लाभ पोहोचविण्याचे कामही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना फॅक्सद्वारे पाठविण्यात आली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.