Contact Banner

सांस्कृतिक कार्यक्रमांनी ‘समन्वय २०२६’चा जल्लोषात समारोप

 

samanvay-2026-cultural-programs-grand-finale-celebration

सांस्कृतिक कार्यक्रमांनी ‘समन्वय २०२६’चा जल्लोषात समारोप

लेवाजगत न्यूज  जळगाव :-
येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या आग्नेय बॅचतर्फे दि. १२ ते १८ एप्रिल दरम्यान आयोजित ‘समन्वय २०२६’ सप्ताहाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

आठवडाभर चाललेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. दि. १२ एप्रिल रोजी आर्ट गॅलरीच्या उद्घाटनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दि. १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. तसेच टीचर डे, प्रोमो आणि डीजे नाईटसारखे विविध कार्यक्रमही उत्साहात पार पडले.

समारोप समारंभास माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, अनिल पाटील, किवा पाटील, सारा पाटील, वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित तसेच रजिस्ट्रार प्रमोद भिरूड आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर धन्वंतरी पूजन व स्व. गोदावरी आजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कार्यक्रमात भरतनाट्यम, कथ्थक, पंजाबी, राजस्थानी, दक्षिण भारतीय तसेच लावणी, हिप-हॉप, फ्यूजन आणि बॉलिवूड नृत्यप्रकार सादर करण्यात आले. याशिवाय गायन, जॅमिंग सेशन, रेट्रो बॉलिवूड सादरीकरण, स्किट्स आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली. यावेळी स्पोर्ट्स ट्रॉफी वितरणही करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तल्हा जमादार, राजनंदिनी पाटील, अंजली महाजन व साक्षी पिसे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वैष्णवी वानखेडे, ओंकार शेलार, कल्याणी चौधरी, अपूर्व पाटील, मुस्कान सिद्दीकी, रुत्विक भुजबळ, वेदांत काकडे, अंजली गुप्ता, चेतन माळी, विराज पाटील व सृष्टी माहुलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.