Contact Banner

राष्ट्रसेवा कार्याची दखल; विजय खर्चे यांना ‘पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार 2026’ प्रदान

 

vijay-kharche-padmashri-dr-manibhai-desai-rashtraseva-award-2026

राष्ट्रसेवा कार्याची दखल; विजय खर्चे यांना ‘पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार 2026’ प्रदान

लेवाजगत न्यूज अकोला : सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक तथा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित श्री. विजय वासुदेव खर्चे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार 2026’ प्रदान करून गौरविण्यात आले.

डॉ. मणीभाई देसाई प्रतिष्ठान, नीती आयोग भारत सरकार, एमएसएमई उद्यम मंत्रालय संलग्नित संस्था तसेच राष्ट्रसेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. हरविलेल्या अल्पवयीन मुली व महिलांचा शोध घेणे, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आणि समाजसेवेतील उल्लेखनीय योगदान याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.

दि. 27 एप्रिल रोजी पुणे येथील सावित्रीबाई फुले स्मारक सभागृहात आयोजित कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक ह.भ.प. हिंदूरत्न डॉ. रवींद्र भोळे, खादी व ग्रामोद्योग मंत्री मा. रवींद्र साठे तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते श्री. खर्चे यांना सन्मानपत्र, शाल व मोमेंटो प्रदान करण्यात आले.

समाजकार्य करताना त्यांना त्यांच्या परिवाराचा व समाजाचा कायम पाठिंबा लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्नी सौ. मंदा विजय खर्चे, मुलगा विवेक, सून सौ. पूजा, मुलगा पराग खर्चे तसेच अकोला येथील भातृमंडळ, समाजबांधव, पोलीस मित्र परिवार यांचे सहकार्य नेहमी लाभत असल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.