Contact Banner

डॉ. रवींद्र भोळे यांचे निष्काम कर्मयोगी कार्य प्रेरणादायी नामदार रवींद्र साठे

 


डॉ. रवींद्र भोळे यांचे निष्काम कर्मयोगी कार्य प्रेरणादायी  नामदार रवींद्र साठे

लेवाजगत न्युज पुणे : समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणे म्हणजे समाजाला प्रेरणा देण्याचे कार्य असल्याचे प्रतिपादन नामदार रवींद्र साठे यांनी केले. पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांना “पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार” प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना नामदार रवींद्र साठे यांनी डॉ. रवींद्र भोळे यांच्या समाजहिताच्या त्यागमय व निष्काम कार्याचे कौतुक केले.

संस्थापक अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे यांनी प्रास्ताविकात भगवद्गीतेतील कर्मयोगाचे महत्त्व स्पष्ट करताना पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई यांनी आयुष्यभर समाजसेवेच्या माध्यमातून निष्काम कर्मयोग साधल्याचे सांगितले. दुग्धोत्पादन, पर्यावरण, निसर्गोपचार, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास सौ. ममता पाटील, डॉ. भावार्थ देखणे, जयश्री पाटील, विजय खर्चे, सुभाष कट्यारमल, प्रमोद सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विकास वारके यांनी भूषविले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल. डी. साळवे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष कट्यारमल यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. कार्यक्रम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह, टिंबर मार्केट, पुणे येथे पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.