लोकशाही दिनाचे ४ मे रोजी आयोजन
लोकशाही दिनाचे ४ मे रोजी आयोजन
लेवाजगत न्यूज जळगाव, दिनांक 30 एप्रिल:-जिल्ह्यात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन यावेळी दि. ४ मे २०२६ सोमवार रोजी आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता अल्पबचत सभागृह येथे पार पडणार आहे.
ज्या नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनामध्ये अर्ज सादर केले आहेत आणि त्या अर्जांबाबत एका महिन्याच्या आत कोणतेही उत्तर प्राप्त झालेले नाही, अशा नागरिकांनी आपल्या वैयक्तिक हितसंबंधा बाबतच्या तक्रारींसह या लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
.png)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत