Contact Banner

आरोहण २०२६ ची सुरुवात ‘कुरुक्षेत्र’च्या भव्य उद्घाटनाने

 

arohan-2026-begins-with-grand-kurukshetra-opening

आरोहण २०२६ ची सुरुवात ‘कुरुक्षेत्र’च्या भव्य उद्घाटनाने

लेवाजगत न्यूज जळगाव : डॉ. गुणवंतराव आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय येथे आजपासून ‘आरोहण २०२६’ वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात ‘कुरुक्षेत्र’ या उद्घाटनपर क्रीडा स्पर्धेने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

कार्यक्रमाचे उद्घाटन यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून तसेच ‘आरोहण २०२६’चे प्रतीकात्मक फलक प्रदर्शित करत करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्यासह प्राध्यापकवर्ग, अध्यापन कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘कुरुक्षेत्र’ अंतर्गत पुढील तीन दिवस विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल यांसारख्या सांघिक व वैयक्तिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संपूर्ण परिसरात निकोप स्पर्धा, मैत्री आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळत होते.

महोत्सवाच्या पुढील कार्यक्रमांमध्ये ८ ते १० मे दरम्यान क्रीडा स्पर्धा, ११ मे रोजी प्रॉम नाईट, १२ मे रोजी डीजे नाईट तसेच त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांनी समारोप होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या ऊर्जा, एकता आणि खिलाडूवृत्तीचा संगम असलेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसर उत्साहाने भारून गेला आहे. यावेळी मान्यवरांनी क्रीडा स्पर्धांमुळे शारीरिक व्यायामासोबतच एकोप्याची भावना वाढीस लागते, असे सांगत प्रत्येक स्पर्धा खिलाडूवृत्तीने खेळण्याचा संदेश दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.