आवरे येथील ग्रामविकास अधिकारी जे.जी.म्हात्रे यांचे निधन
आवरे येथील ग्रामविकास अधिकारी जे.जी.म्हात्रे यांचे निधन
उरण : सुनिल ठाकूर-उरण तालुक्यातील आवरे गावचे भूमिपुत्र ग्रामविकास अधिकारी जनार्दन गणपत म्हात्रे (57)यांचे नुकतीच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबियांवर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली असून, कधीही न भरून येणारी दुःखाची दरी निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत, मुरुड,पनवेल, उरण तालुक्यातील महत्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून सक्षमतेने काम केले.सध्या ते पेण तालुक्यातील जोहे ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत होते.
स्वभावाने अतिशय माणुसकी जपणारे जे.जी.म्हात्रे यांनी अनेक गरीब,गरजूना दिवस - रात्र न पाहता मदत केली आहे.त्यामुळे समाजातही त्यांना मानाचे स्थान होते. त्यांनी बुधवारी सायंकाळी 5:30 वाजता पनवेल येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या अंत्ययात्रेसाठी त्यांच्या मूळ गावी आवरे येथे नातेवाईक, मित्रमंडळीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.त्यांच्या मागे त्यांची पत्नी दोन मुलगे,सून आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत