लहान वाघोदा येथे कामगार दिनानिमित्त कामगाराच्या हस्ते झेंडावंदन
लहान वाघोदा येथे कामगार दिनानिमित्त कामगाराच्या हस्ते झेंडावंदन
लहान वाघोदा लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
१ मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनानिमित्त लहान वाघोदा ग्रामपंचायत कार्यालयात अत्यंत प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. गावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ. दिपाली जितेंद्र चौधरी (मॅडम) यांनी स्वतः झेंडावंदन न करता गावातील गरीब कुटुंबातील कामगार गंगाराम पांडुरंग तेली यांच्या हस्ते ध्वजारोहण करून समाजासमोर आदर्श निर्माण केला.
कामगार दिनाचे औचित्य साधत श्रमिकांचा सन्मान व्हावा या भावनेतून सरपंच दिपाली चौधरी यांनी हा मान कामगाराला दिला. विशेष म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी त्यांनी झेंडावंदनाचा सन्मान कामगारांनाच देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. त्यांच्या या सामाजिक आणि संवेदनशील उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
तसेच जिल्हा परिषद मराठी शाळेत व्यवस्थापन समिती सदस्य जितेंद्र चांगदेव चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ. दिपाली जितेंद्र चौधरी, उपसरपंच सौ. वंदना कोलते, भाजपा रावेर तालुका चिटणीस तथा ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र चौधरी, फातमा तडवी, पूजा कोलते, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत पाटील, जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मिनाक्षी फेगडे, स्वातेश सरोदे, ग्रामस्थ गणेश चौधरी, शशिकांत चौधरी, भिका न्हावी, अंगणवाडी सेविका प्रतिभा शिंदे, रेखा बाऊस्कर, मदतनीस भारती झोपे, वैशाली कोळी, आशा वर्कर मनिषा कोळी, मनिषा सोनवणे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी रविंद्र कोळी, वैभव चौधरी, कन्हैया आदिवाले व दिनेश आदिवाले उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत