सावदा नगरपरिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
सावदा नगरपरिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
लेवाजगत न्यूज सावदा, दि. १ मे २०२६ :- सावदा नगरपरिषदेच्या वतीने महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नगराध्यक्षा सौ. रेणुका राजेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर आ. गं. हायस्कूल येथील विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती फलकास तसेच भारतीय मजदूर संघ संलग्न शाखा-सावदा यांच्या फलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच सन २०२५-२६ या वर्षासाठी दिव्यांग बांधवांना धनादेशांचे वितरण करण्यात आले.
सावदा नगरपरिषदेस नुकतीच प्राप्त झालेल्या अग्निशमन दलाच्या नवीन वाहनाचे पूजनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. रेणुका राजेंद्र पाटील, मुख्याधिकारी श्री. भुषण वर्मा, पोलीस उपनिरीक्षक श्री. विशाल पाटील, नवनिर्वाचित नगरपरिषद सदस्य तसेच नगरपरिषदेचे अधिकारी,शिक्षक,होमगार्ड व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत