उमेश्वर माध्यमिक विद्यालय, दसनूरचा 83.78 टक्के निकाल
उमेश्वर माध्यमिक विद्यालय, दसनूरचा 83.78 टक्के निकाल
लेवाजगत न्यूज सिंगनूर ता. रावेर -येथून जवळच असलेल्या दसनूर येथील उमेश्वर माध्यमिक विद्यालयाचा निकाल 83.78 टक्के लागला. विद्यालयातून 92.40 टक्के गुण मिळवून ऋतुजा महेंद्र अजलसोंडे ही विद्यार्थिनी प्रथम आली. 92.20 टक्के गुण मिळवून माधुरी गणेश कोळी ही विद्यार्थिनी द्वितीय आली .तर प्राप्ती मयूर महाजन ही विद्यार्थिनी 90.40 टक्के गुण मिळवून विद्यालयात तृतीय आली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक एस. जी. महाजन, पर्यवेक्षक आर.एल. तायडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद महाजन, उपाध्यक्ष जगन्नाथ महाजन, चेअरमन राजेंद्र महाजन, सचिव दत्तात्रय चौधरी सहसचिव संजय महाजन व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत