Contact Banner

कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह जे. टी. महाजन इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेत प्रथम क्रमांक पटकावला

 

kritika-phegde-scores-96-20-percent-first-rank-jt-mahajan-english-medium-school

कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह जे.टी. महाजन इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेत प्रथम क्रमांक पटकावला

लेवाजगत न्यूज न्हावी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२६ मध्ये जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालात फैजपूर येथील जे. टी. महाजन इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी कृतिका अजय फेगडे हिने ९६.२० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला.

कृतिकाने इंग्रजी विषयात ९७, गणितात ९६, विज्ञान व तंत्रज्ञान विषयात ९८ तर सामाजिक शास्त्र विषयात ९३ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद तसेच परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले.


kritika-phegde-scores-96-20-percent-first-rank-jt-mahajan-english-medium-school


विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

विद्यालयाच्या या उल्लेखनीय निकालामुळे फैजपूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पालक व नागरिकांकडून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.