म्युनिसिपल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फैजपूरचा दहावीचा निकाल ७२.२२ टक्के पारस चौधरी विद्यालयात प्रथम; गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक
म्युनिसिपल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फैजपूरचा दहावीचा निकाल ७२.२२ टक्के
पारस चौधरी विद्यालयात प्रथम; गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक
लेवाजगत न्यूज फैजपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. (दहावी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, फैजपूर येथील म्युनिसिपल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने यशाची परंपरा कायम राखत ७२.२२ टक्के निकालाची नोंद केली आहे. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.
विद्यालयातून पारस सचिन चौधरी याने ८६.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. शिवम विजय बोदडे आणि राजनंदिनी संतोष चव्हाण यांनी प्रत्येकी ८५.४० टक्के गुण मिळवत संयुक्त द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच दिव्याभारती विनोद तायडे हिने ८४.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक संपादन केला.
या यशाबद्दल फैजपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, नगराध्यक्षा सौ. दामिनी सराफ, उपनगराध्यक्षा, सर्व नगरसेवक व नगरसेविका, शिक्षण सभापती, शालेय समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत