Contact Banner

माहेरी आलेल्या ज्योतीताई झोपे यांचे दुःखद निधन सावदा शहरावर शोककळा; नाशिक येथे वास्तव्यास असलेल्या ज्योतीताईंची अखेरची श्वासोच्छ्वास माहेरी

 

jyotitai-zhope-sad-demise-savda-city-mourns


माहेरी आलेल्या ज्योतीताई झोपे यांचे दुःखद निधन

सावदा शहरावर शोककळा; नाशिक येथे वास्तव्यास असलेल्या ज्योतीताईंची अखेरची श्वासोच्छ्वास माहेरी

लेवाजगत न्यूज सावदा : सावदा शहरातील गांधी चौक परिसरातील कै. वासुदेव तुकाराम चौधरी यांची कन्या  ज्योती मिलिंद झोपे (वय ६०) यांचे रविवार दि. १० मे २०२६ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास माहेरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सावदा शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

ज्योतीताई झोपे या नाशिक येथे आपल्या परिवारासह वास्तव्यास होत्या. कौटुंबिक लग्न समारंभासाठी त्या काही दिवसांपूर्वी सावदा येथे माहेरी आल्या होत्या. मात्र अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांचे निधन झाले. माहेरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याने चौधरी व झोपे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

स्वभावाने प्रेमळ, मनमिळावू व कुटुंबवत्सल म्हणून ज्योतीताई परिचित होत्या. त्यांच्या निधनाने नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिचितांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारास नातेवाईक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.