Contact Banner

बकरी ईद सण सर्वधर्म समभावाने साजरा करा; शांतता समिती बैठकीत धुळे प्रशासनाचे आवाहन

 

celebrate-bakri-eid-with-communal-harmony-administration-appeal-in-peace-committee-meeting

बकरी ईद सण सर्वधर्म समभावाने साजरा करा; शांतता समिती बैठकीत धुळे प्रशासनाचे आवाहन

लेवाजगत न्यूज | धुळे : जिल्ह्यात बकरी ईद हा सण सर्वधर्म समभावाने आणि शांततेत साजरा करावा. कायदा व सुव्यवस्थेचे सर्वांनी पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिल्या.


celebrate-bakri-eid-with-communal-harmony-administration-appeal-in-peace-committee-meeting


बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडनीस, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. गिरीश पाटील, महानगरपालिका उपायुक्त करुणा डहाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व शांतता समिती सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी सांगितले की, बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी नियोजन केले आहे. सणाचे पावित्र्य टिकून राहील याची काळजी घेत सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे. महानगरपालिकेने स्वच्छता, वीज, पाणी आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच सणासाठी लागू असलेल्या नियमांचे पालन करावे, असे त्यांनी नमूद केले.

महानगरपालिका आयुक्त नितीन कापडनीस यांनी स्वच्छतेसाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती दिली. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सणादरम्यान पोलिस बंदोबस्ताची तयारी स्पष्ट करताना समाज माध्यमांवर अफवा पसरवू नयेत व त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.

पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. गिरीश पाटील यांनी बकरी ईद निमित्त जनावरांची तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.