Contact Banner

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; ५ महिलांची सुटका, २ महिला आरोपी ताब्यात प्रताप हायस्कूल परिसरात पोलिसांचा धडक छापा; ११ जणांविरुद्ध गुन्हा, ९ आरोपी फरार

chopda-prostitution-racket-busted-5-women-rescued-2-women-arrested


चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; ५ महिलांची सुटका, २ महिला आरोपी ताब्यात

प्रताप हायस्कूल परिसरात पोलिसांचा धडक छापा; ११ जणांविरुद्ध गुन्हा, ९ आरोपी फरार

लेवाजगत न्यूज चोपडा -शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने शहरातील प्रताप हायस्कूल व तहसील कार्यालयाच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसाय रॅकेटवर धडक कारवाई करत ५ पीडित महिलांची सुटका केली आहे. या कारवाईत दोन महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी ९ आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.


*चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; ५ महिलांची सुटका, २ महिला आरोपी ताब्यात प्रताप हायस्कूल परिसरात पोलिसांचा धडक छापा; ११ जणांविरुद्ध गुन्हा, ९ आरोपी फरार >>* https://www.lewajagat.com/2026/05/chopda-prostitution-racket-busted-5-women-rescued-2-women-arrested.html


पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २९ मे रोजी सायंकाळी ६:४० वाजता प्रताप हायस्कूल व तहसील कार्यालयाच्या मागील स्मशानभूमी रस्त्यालगत छापा टाकण्यात आला. तपासात महिलांना पैशांचे आमिष दाखवून आणि आश्रय देऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे उघड झाले.

या कारवाईत ५ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्या राजस्थान आणि नेपाळ येथील रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांना सुरक्षित स्थळी हलवून आवश्यक कायदेशीर मदत व संरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणी शिल्पा राजू लामा आणि पूजा टीकाराम थापा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर ९ आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. मानवी तस्करी, महिलांचे शोषण आणि वेश्याव्यवसायासंदर्भातील माहिती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.