Contact Banner

शेतकरीविरोधी धोरणांविरोधात काँग्रेसचे जळगावात आंदोलन पेट्रोलपंपावर मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र व राज्य सरकारचा निषेध

 

congress-protest-in-jalgaon-against-anti-farmer-policies-melody-chocolates-distributed

शेतकरीविरोधी धोरणांविरोधात काँग्रेसचे जळगावात आंदोलन

पेट्रोलपंपावर मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र व राज्य सरकारचा निषेध

लेवाजगत न्यूज जळगाव : केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ आज जळगाव येथे काँग्रेस पक्षातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष युवानेते ॲड. धनंजयभाऊ चौधरी, जमील शेख आणि अविनाश भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करत पेट्रोलपंपावर नागरिकांना ‘मेलोडी’ चॉकलेट वाटप केले. “चॉकलेट देणारे सरकार” अशी टीका करत सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निषेधार्थ निवेदन सादर करण्यात आले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

या आंदोलनात जिल्हाभरातून काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.