नवीमुंबई ते चिरनेर दिघोडे मार्गे वशेणी एन एम एम टीची बस सेवा सुरू करण्याची मागणी
नवीमुंबई ते चिरनेर दिघोडे मार्गे वशेणी एन एम एम टीची बस सेवा सुरू करण्याची मागणी
उरण : सुनिल ठाकूर-
जेएनपीए बंदर,अटल सेतू आणि नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे उरण पुर्व विभागातील गावांचा झपाट्याने विकास वाढत असून नागरिकरण ही झपाट्याने वाढत आहे.मात्र नवीमुंबई शहराकडे ये- जा करण्यासाठी प्रवासी वाहनांची सुविधा उपलब्ध नसल्याने काँलेज, महाविद्यालय येथे जाणारे विद्यार्थी, नोकरदार, प्रवाशी नागरिक, रुग्णालयात जाणारे रुग्ण त्यांचे नातेवाईक मंडळीची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.तरी नवीमुंबई ते चिरनेर दिघोडे मार्गे वशेणी एन एम एम टी ची बस सेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात असून त्यासाठी चिर्ले, वेश्वी, दिघोडे, विंधने, चिरनेर,मोठी जुई, कळंबुसरे,कोप्रोली,पिरकोन,सारडे , वशेणी येथील सरपंचांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
उरण, पनवेल एस टी बस आगार व्यवस्थापनाने उरण शहराकडे व उरण पुर्व विभागातील गावांकडे ये- जा करणाऱ्या एसटी बसची संख्या कमी केल्याने त्याचा सर्वाधिक त्रास हा विद्यार्थी, चाकरमानी, प्रवाशी नागरिकांना होतच आहे.त्यात नवीमुंबई ते कोप्रोली मार्गे वशेणी कडे जाणारी एन एम एम टी ची बस सेवा काही कारणाने बंद पडल्याने या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागत आहेत.अशातच नवीमुंबई ते उरण शहराकडे ये- जा करणारी एन एम एम टी ची बस सेवा सुरू असल्याने निश्चित त्याचा सर्वाधिक फायदा हा सर्वसामान्य नागरिकांना होत असून त्यांचा पैसा आणि वेळ वाचत आहे.
त्यात पनवेल कडे ये- जा करणाऱ्या एसटी बसची संख्या पनवेल बस आगार व्यवस्थापकांनी कमी केल्याने त्याचा नाहक त्रास हा नवीमुंबई, पनवेल या महत्त्वाच्या शहरांकडे ये- जा करणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार, प्रवाशी नागरिक, रुग्णालयात जाणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मंडळी यांना सहन करावा लागत असून तासनतास गाडीची वाट बघावी लागते तसेच प्रवाशांसाठी जादा पैसे मोजावे लागत आहे.सध्या जेएनपीए बंदर,अटल सेतू आणि नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे उरण पुर्व विभागातील गावांचा झपाट्याने विकास वाढत असून नागरिकरण ही वाढत आहे.मात्र नवीमुंबई शहराकडे ये- जा करण्यासाठी प्रवासी वाहनांची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी, चाकरमानी, प्रवाशी नागरिक, रुग्णालयात जाणारे रुग्ण, नातेवाईक मंडळीची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.तरी नवीमुंबई ते दिघोडे चिरनेर मार्गे वशेणी एन एम एम टी ची बस सेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.त्यासाठी चिर्ले, वेश्वी, दिघोडे, विंधने, चिरनेर,मोठी जुई, कळंबुसरे,कोप्रोली,पिरकोन,सारडे , वशेणी,केळवणे येथील सरपंचांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत