Contact Banner

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव; महादेव हॉस्पिटलच्या तत्परतेने मिळाले नवजीवन

one-phone-call-saved-editors-life-mahadev-hospital-gave-new-life

नवीमुंबई ते चिरनेर दिघोडे मार्गे वशेणी एन एम एम टीची बस सेवा सुरू करण्याची मागणी   उरण : सुनिल ठाकूर         जेएनपीए बंदर,अटल सेतू आणि नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे उरण पुर्व विभागातील गावांचा झपाट्याने विकास वाढत असून नागरिकरण ही झपाट्याने वाढत आहे.मात्र नवीमुंबई शहराकडे ये- जा करण्यासाठी प्रवासी वाहनांची सुविधा उपलब्ध नसल्याने काँलेज, महाविद्यालय येथे जाणारे विद्यार्थी, नोकरदार, प्रवाशी नागरिक, रुग्णालयात जाणारे रुग्ण त्यांचे नातेवाईक मंडळीची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.तरी नवीमुंबई ते चिरनेर दिघोडे मार्गे वशेणी एन एम एम टी ची बस सेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात असून त्यासाठी चिर्ले, वेश्वी, दिघोडे, विंधने, चिरनेर,मोठी जुई, कळंबुसरे,कोप्रोली,पिरकोन,सारडे , वशेणी येथील सरपंचांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.     उरण, पनवेल एस टी बस आगार व्यवस्थापनाने उरण शहराकडे व उरण पुर्व विभागातील गावांकडे ये- जा करणाऱ्या एसटी बसची संख्या कमी केल्याने त्याचा सर्वाधिक त्रास हा विद्यार्थी, चाकरमानी, प्रवाशी नागरिकांना होतच आहे.त्यात नवीमुंबई ते कोप्रोली  मार्गे वशेणी कडे जाणारी एन एम एम टी ची बस सेवा काही कारणाने बंद पडल्याने या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागत आहेत.अशातच नवीमुंबई ते उरण शहराकडे ये- जा करणारी एन एम एम टी ची बस सेवा सुरू असल्याने निश्चित त्याचा सर्वाधिक फायदा हा सर्वसामान्य नागरिकांना होत असून त्यांचा पैसा आणि वेळ वाचत आहे.     त्यात पनवेल कडे ये- जा करणाऱ्या एसटी बसची संख्या पनवेल बस आगार व्यवस्थापकांनी कमी केल्याने त्याचा नाहक त्रास हा नवीमुंबई, पनवेल या महत्त्वाच्या शहरांकडे ये- जा करणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार, प्रवाशी नागरिक, रुग्णालयात जाणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मंडळी यांना सहन करावा लागत असून तासनतास गाडीची वाट बघावी लागते तसेच प्रवाशांसाठी जादा पैसे मोजावे लागत आहे.सध्या जेएनपीए बंदर,अटल सेतू आणि नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे उरण पुर्व विभागातील गावांचा झपाट्याने विकास वाढत असून नागरिकरण ही वाढत आहे.मात्र नवीमुंबई शहराकडे ये- जा करण्यासाठी प्रवासी वाहनांची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी, चाकरमानी, प्रवाशी नागरिक, रुग्णालयात जाणारे रुग्ण, नातेवाईक मंडळीची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.तरी नवीमुंबई ते दिघोडे चिरनेर  मार्गे वशेणी एन एम एम टी ची बस सेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.त्यासाठी चिर्ले, वेश्वी, दिघोडे, विंधने, चिरनेर,मोठी जुई, कळंबुसरे,कोप्रोली,पिरकोन,सारडे , वशेणी,केळवणे येथील सरपंचांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव; महादेव हॉस्पिटलच्या तत्परतेने मिळाले नवजीवन

लेवाजगत न्यूज जळगाव : घाम खूप येतोय खांदा दुखतोय छातीत असह्य वेदना होत आहेत सकाळी साडेआठ वाजता आलेला हा फोन केवळ मदतीचा नव्हता, तर मृत्यूशी सुरू असलेल्या झुंजीचा आर्त आवाज होता. मात्र योग्य वेळी घेतलेला निर्णय, डॉक्टरांची तत्परता आणि महादेव हॉस्पिटलच्या सज्जतेमुळे एका संपादकाला अक्षरशः नवजीवन मिळाले.

शहरातील महादेव हॉस्पिटल येथे आयोजित हृदयविकार तपासणी शिबिरादरम्यान ही थरारक घटना घडली. सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी जनसंपर्क अधिकारी राहुल कुलकर्णी यांच्या मोबाईलवर संपादक निलकंठ वाणी यांचा फोन आला. फोनवरील आवाज घाबरलेला होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या, खांदा आणि छातीत तीव्र वेदना सुरू होत्या.क्षणाचाही विलंब न करता राहुल कुलकर्णी यांनी ही गंभीर हृदयविकाराची लक्षणे असल्याचे ओळखले आणि तात्काळ महादेव हॉस्पिटलमध्ये या, असा सल्ला दिला. दुसरीकडे, रुग्णालयाचे प्रशासक एन. जी. चौधरी यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवली.रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचताच हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सिद्धेश खांदे यांनी तातडीने ईसीजी केले. अहवाल पाहताच रुग्णाला गंभीर स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले. तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. रक्तदाब नियंत्रणात आल्यानंतर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यामध्ये हृदयातील मुख्य रक्तवाहिनी ९९ टक्के  ब्लॉक असल्याचे निदर्शनास आले.मृत्यू प्रत्येक क्षणी जवळ येत असताना डॉक्टरांनी वेळ न दवडता अँजिओप्लास्टी केली आणि यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन मिळाले. विशेष म्हणजे, त्या वेळी रुग्णाच्या खिशात एक रुपयाही नव्हता. मात्र शासन योजनेचा लाभ मिळवून देत संपूर्ण उपचार मोफत करण्यात आले.रुग्णाच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. जर काही मिनिटे उशीर झाला असता, तर आज चित्र वेगळे असते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.या प्रसंगानंतर निलकंठ वाणी यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, असं म्हणतात डॉक्टर हे देवाचं रूप असतं. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने डॉक्टर देवदूत बनून आले आणि माझा जीव वाचवला. त्या सर्व डॉक्टरांचे आणि महादेव हॉस्पिटलचे मी मनःपूर्वक आभार मानतो. 

रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आणण्यात कोणताही विलंब झाला नाही, हीच त्याच्या जीव वाचण्यामागची सर्वात मोठी गोष्ट ठरली. छातीत वेदना, जास्त घाम येणे आणि खांद्यात दुखणे ही हृदयविकाराच्या झटक्याची महत्त्वाची लक्षणे आहेत. ईसीजीमध्ये गंभीर हृदयविकाराचा झटका स्पष्ट झाला होता. अँजिओग्राफीमध्ये हृदयातील मुख्य रक्तवाहिनी ९९ टक्के ब्लॉक असल्याचे दिसून आले. तातडीने अँजिओप्लास्टी करून रक्तपुरवठा सुरळीत करण्यात आला आणि रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे. योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.- डॉ. सिद्धेश खांदे, हृदयरोगतज्ज्ञ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.