Contact Banner

दशपर्णी अर्क, गोकृपा अमृत व जीवामृत तयार करण्याची उरण तालुक्यात प्रात्यक्षिके

 

demonstrations-of-dashparni-ark-gokrupa-amrut-jivamrut-in-uran-taluka

दशपर्णी अर्क, गोकृपा अमृत व जीवामृत तयार करण्याची उरण तालुक्यात प्रात्यक्षिके

उरण | सुनिल ठाकूर

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने भातबियाणांसह विविध खरीप पिकांच्या उत्पादनासाठी शेतकरी तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर उरण तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाचा आढावा घेतला जात असून शेतकऱ्यांना विविध मार्गदर्शन केले जात आहे. महाबीज तसेच खासगी कंपन्यांकडून बियाणे व खतांचा पुरवठाही उपलब्ध करून दिला जाणार आहे.


lewajagat.com


दरम्यान, उरण तालुका कृषी विभागामार्फत कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी दशपर्णी अर्क, गोकृपा अमृत आणि जीवामृत तयार करण्याची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येत आहेत. पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे तसेच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

चिरनेर येथील श्री महागणपती शेतकरी गटाच्या माध्यमातून दशपर्णी अर्क तयार करण्यात आला. कृषी सहाय्यक अधिकारी सुषमा गायकवाड आणि कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. १७) शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

या दशपर्णी अर्कासाठी कडुलिंब, करंज, निरगुडी, घाणेरी, सिताफळ, रुई, पपई, मोहरी, एरंड, लाल कन्हेरी, गुळवेल, धोतरा यांची पाने, तसेच शेण व गोमूत्र यांचे मिश्रण वापरण्यात आले. या नैसर्गिक घटकांपासून तयार होणारा अर्क पिकांवरील कीड व रोग नियंत्रणासाठी उपयुक्त ठरत असून मातीची सुपीकता वाढविण्यास मदत करतो. तसेच पिकांची वाढ आणि उत्पादनक्षमतेतही वाढ होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

नैसर्गिक, पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीसाठी हे अर्क अत्यंत उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांनी त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.