धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूरचा बारावीचा निकाल ९३.७५ टक्के
धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूरचा बारावीचा निकाल ९३.७५ टक्के
लेवाजगत न्यूज फैजपूर : तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालय, फैजपूर येथील इयत्ता बारावीचा निकाल यंदा ९३.७५ टक्के लागला असून महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
विज्ञान शाखेचा निकाल ९८.८९ टक्के लागला असून प्रथम क्रमांक श्रेया सुभाष शेकदार हिने ७८ टक्के गुण मिळविले. द्वितीय क्रमांक पलक रोकेश तरळेजा हिने ७५.१७ टक्के तर तृतीय क्रमांक पूर्वा मिलिंद चौधरी हिने ७४.८३ टक्के गुण प्राप्त केले.
वाणिज्य शाखेचा निकाल ७९.१७ टक्के लागला असून प्रथम क्रमांक ओजस्वी चेतन बोंदे हिने ७५ टक्के गुण मिळविले. द्वितीय क्रमांक कृष्णा रमेश कुंकुंजा याने ७७.१७ टक्के तर तृतीय क्रमांक अर्णव उत्पल चौधरी याने ७४ टक्के गुण संपादन केले.
कला शाखेचा निकाल ७९.८२ टक्के लागला असून प्रथम क्रमांक ईशान नंदकिशोर पाटील याने ७९ टक्के गुण मिळविले. द्वितीय क्रमांक रोहित रहिमान तडवी याने ६२.३३ टक्के तर तृतीय क्रमांक गिरीश कैलास चव्हाण याने ५० टक्के गुण मिळविले.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्री. शिरीषदादा चौधरी, उपाध्यक्ष श्री. एस. के. चौधरी, श्री. मिलिंद शंकरराव वाघुळे, चेअरमन श्री. तिलाधर विश्वनाथ चौधरी, सचिव श्री. एम. टी. फिरके, व्हा. चेअरमन प्रा. के. आर. चौधरी तसेच सहसचिव प्रा. नंदकुमार भंगाळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळे, पर्यवेक्षक प्रा. उत्पल एल. चौधरी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत