Contact Banner

युवा,अभ्यासू आणि संघर्षशील नेतृत्वाला काँग्रेसची मोठी संधी रावेर लोकसभा क्षेत्राच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी धनंजय शिरीष चौधरी

 

dhananjay-shirish-chaudhari-appointed-congress-district-president-raver-loksabha

युवा,अभ्यासू आणि संघर्षशील नेतृत्वाला काँग्रेसची मोठी संधी

रावेर लोकसभा क्षेत्राच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी धनंजय शिरीष चौधरी

लेवाजगत न्यूज | सावदा-जळगाव पूर्व विभाग अर्थात रावेर लोकसभा क्षेत्राच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी युवा नेते धनंजय शिरीष चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागातील संघटनेला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

धनंजय चौधरी यांनी यापूर्वी रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. निवडणुकीत अपयश आले असले तरी त्यांनी सातत्याने जनतेशी संपर्क कायम ठेवत पक्षाची ध्येयधोरणे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

काँग्रेसच्या जळगाव जिल्ह्यातील इतिहासात धनंजय चौधरी हे पक्षाचे सर्वात तरुण जिल्हाध्यक्ष ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे युवकांमध्ये पक्षाबद्दल नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

धनंजय चौधरी यांना समृद्ध राजकीय वारसा लाभला आहे. माजी मंत्री धनाजी नाना चौधरी, मधुकरराव चौधरी तसेच त्यांचे पिताजी शिरीषदादा चौधरी यांच्या राजकीय परंपरेचा वारसा पुढे नेत आता त्यांना मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.

सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटन वाढविण्याची त्यांची कार्यशैली आणि जनतेशी असलेला मजबूत संपर्क यामुळे आगामी काळात रावेर लोकसभा क्षेत्रात काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.