Contact Banner

जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे विद्यालयाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा


jankibai-janardan-thakur-school-avare-adds-another-feather-of-honor


 जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे विद्यालयाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा

लेवाजगत


 प्रतिनिधी (सचिन पाटील) उरण तालुक्यातील आदर्श विद्यालय म्हणजे जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मेडियम स्कूल आवरे विद्यालय  होय  संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांच्या स्वप्नातील विद्यालय तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय आणि जणू काही ब्रीद असणारे विद्यालय ही विद्यालयाची ख्याती विद्यालयतील विद्यार्थी अभ्यासक्रमासोबत इतर  सहाय्यक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असतात हे विशेष होय विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी नियती नरेंद्र ठाकूर या विद्यार्थिनीची रायगड जिल्हा खोखो अशी जिल्ह्यास्तरीय  संघामध्ये निवड झाली आहे कु नियती नरेंद्र  ठाकूर ही  जानकीबाई जनार्दन ठाकूर  स्कुल विद्यालयाची   विद्यार्थिनी होय लहानपणापासूनच अभ्यासात अतिशय हुशार वक्तृत्व खुप छान तसेच इतर सहशालेय उपक्रमात तरबेज व नृत्य असो किंवा इतर खेळ असो  यात ती अग्रेसर तसेच  विद्यालयातील क्रीडा शिक्षक शुभम ठाकूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली मार्शल आर्ट्स कराटे चे   शिक्षण घेत आहे म्हणजे बहुगुणी होय आणि तिच्या या विशेष निवडीने सर्व स्तरावरून आनंद व्यक्त केला जात आहे व तिच्यावर कौतुकीची थाप दिली जात आहे तसेच सर्व स्तरावर तीचे अभिनंदन करण्यात येत आहे  पहिल्यांदा नियतीच्या आई-वडिलांनी अभिनंदन केले आहे तसेच जानकीबाई  जनार्दन ठाकूर स्कूलचे विश्वस्त व खजिनदार श्री वामन ठाकूर सर अध्यक्ष प्रतिक ठाकूर सर  विश्वस्त सौ  अलका ठाकूर मॅडम आदिनाथ ठाकूर,सर सौ  रीना ठाकूर मॅडम श्रीमती सिंधू ठाकूर मॅडम  विद्यालयाच्या मुख्याध्यापिका  सौ निकिता म्हात्रे  मॅडम शिक्षकवृंद व  शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नियतीचे  विशेष कौतुक करण्यात आले आहे  तसेच तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अशा प्रकारे  जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कुल च्या शिरपेचात आणखीन एक  मानाचा तुरा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.