लोहारा एक्सप्रेस फिडर चा वीज पुरवठा सुरळीत करावा-फैजपूर नगरसेवकांची कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी
लोहारा एक्सप्रेस फिडर चा वीज पुरवठा सुरळीत करावा-फैजपूर नगरसेवकांची कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी
लेवाजगत न्यूज फैजपूर- तालुका यावल नगरपरिषदेचा पाणीपुरवठा हा लोहारा तालुका रावेर जॅकवेल वरून होत असतो आणि त्यासाठी लागणारी एक्सप्रेस फिडर लाईन ही गौरखेडा वीज उपकेंद्रातून दिली गेलेली आहे. परंतु या ठिकाणी दररोज होणारा वीज पुरवठा हा एक्सप्रेस फिडर लाईन असताना सुद्धा खंडित होत असल्यामुळे याचा परिणाम हा शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत असल्याकारणाने आज सर्व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन या सर्व तक्रारी कार्यकारी अभियंता यांच्याकडे मांडून त्यासंदर्भात आज निवेदन देण्यात आले.
बऱ्याच वेळा वीज पुरवठा खंडित केला जातो कोणती पूर्व सूचना न देता केला जातो त्यासोबतच एखाद्या वेळेस सूचना दिलीच तर दोन तास सूचना देऊन जास्त वेळ वीज पुरवठा खंडित होतो आणि या सर्वांचा परिणाम हा शहर पाणीपुरवठा वरती होत असल्याकारणाने या सर्व विषयाची तात्काळ दखल घेऊन सतत खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा. तसेच फैजपूर येथील फिल्टर प्लांट वरती एक्सप्रेस फिडर लाईन असताना सुद्धा या ठिकाणी असेच प्रॉब्लेम सातत्याने येत आहे.
त्यासोबतच लोहारा जॅकवेल साठी असलेली एक्सप्रेस फिडर लाइन ही ज्या गौरखेडा सबस्टेशन मधून देण्यात आलेली आहे या एक्सप्रेस फिडर वरती बरे चसे अवैध वीज कनेक्शन असल्यामुळे हे संपूर्ण अवैध कनेक्शन काढण्यात यावे ही सुद्धा मागणी आज स्वतंत्र निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता सावदा श्री महाजन साहेब यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी भाजपा गटनेते सिद्धेश्वर वाघुळदे सर उपनगराध्यक्ष निकिताताई कोळी, उपगट नेते सुरज गाजरे,नगरसेवक विनोद (पप्पू ) चौधरी, महेंद्र मंडवाले, सागर होले, राहुल गुजराथी, माजी उपनगराध्यक्ष हेमराज चौधरी, संदीप भारंबे ( गोटू भाऊ ), नरेंद्र चौधरी, जितेंद्र भारंबे, राजेश महाजन सर, अनंत भाऊ नेहेते यांच्यासह सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते तात्काळ हे दोघं विषय मार्गी लावण्याच्या सूचना सुद्धा कार्यकारी अभियंता यांनी संबंधित अधिकाऱ्याना यावेळी दिल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत