Contact Banner

मध्य प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वांदो पंच सेमिनार व पंच परीक्षेसाठी सुभाष पाटील यांची परीक्षक म्हणून नियुक्ती

 

subhash-patil-appointed-examiner-national-taekwondo-referee-seminar-madhya-pradesh

मध्य प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वांदो पंच सेमिनार व पंच परीक्षेसाठी सुभाष पाटील यांची परीक्षक म्हणून नियुक्ती

उरण (सुनिल ठाकूर): यांची तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया व तायक्वांदो असोसिएशन ऑफ उत्तराखंड यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पंच सेमिनार व राष्ट्रीय पंच परीक्षेसाठी परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा सेमिनार ८ ते १० मे २०२६ दरम्यान येथील इनडोअर स्टेडियममध्ये पार पडणार आहे.

रायगडचे सुपुत्र असलेले सुभाष पाटील हे ७ वी डिग्री ब्लॅक बेल्टधारक तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच असून त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक तायक्वांदो स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. ते कॉमनवेल्थ तायक्वांदो रेफरी युनियनचे सदस्य देखील आहेत.

त्यांनी दक्षिण कोरिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर तायक्वांदो स्पर्धा २००४ मध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक व पंच म्हणून काम पाहिले होते. तसेच भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा २०१०, कॉमनवेल्थ स्पर्धा २०११, दक्षिण कोरिया आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा २०११, ११ वी इजराइल ओपन स्पर्धा २०१३, ८ वी स्कॉटिश ओपन स्पर्धा २०१३, कोरिया ओपन २०१४, साफ गेम २०१६, गोवा येथील लुसोफोतीया तायक्वांदो स्पर्धा, कॅनडा ओपन व पॅरा ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप २०१७ तसेच २०२३ वर्ल्ड तायक्वांदो प्रेसिडेंट कप, ओशियाना पॅरा व ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धांमध्ये त्यांनी पंच व स्पर्धा नियंत्रक म्हणून जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

याशिवाय आणि या स्पर्धांसाठी त्यांची पंच प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती.

सुभाष पाटील हे ७ मे २०२६ रोजी विदिशा, मध्य प्रदेश येथे रवाना होणार असून त्यांच्या या निवडीबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई), रायगड तायक्वांदो असोसिएशनचे पदाधिकारी, तसेच , , , आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.