मधुकर सहकारी साखर कारखाना प्रकरण : तहसीलदार यावल यांच्यावर शिस्तभंग कारवाईची मागणी
मधुकर सहकारी साखर कारखाना प्रकरण : तहसीलदार यावल यांच्यावर शिस्तभंग कारवाईची मागणी
लेवाजगत न्यूज यावल : मौजे आमोदे ता. यावल जि. जळगाव येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरील अवैध गौण खनिजाची अनधिकृत उत्खनन व विक्री करून शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाचे नुकसान केल्याप्रकरणी तहसीलदार यावल यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांच्याकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांनी विविध तारखांना तक्रारी व निवेदने सादर केली होती. तसेच या प्रकरणी विविध विभागांकडून पत्रव्यवहार व चौकशी अहवालही सादर करण्यात आले आहेत. मंडळ अधिकारी बामणोद यांनी केलेला पंचनामा व अहवाल, तसेच तहसीलदार यावल यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापना शाखेकडून तत्कालीन मंडळ अधिकारी बबिता सुधाकर चौधरी, ग्राम महसूल अधिकारी शैलेश अंकुश झोटे आदी संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अंतर्गत विभागीय चौकशीसाठी दोषारोप पत्र देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच कार्यालय प्रमुख म्हणून तहसीलदार यावल यांनी पर्यवेक्षणीय कामकाजात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून संबंधित अहवाल स्वीकृत करून पुढील कारवाई करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
.png)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत