सावदा पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी नारायण भागवत पाटील यांचे निधन
सावदा पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी नारायण भागवत पाटील यांचे निधन
लेवाजगत न्यूज सावदा : येथील ओम कॉलनी परिसरातील रहिवासी तथा सावदा नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी नारायण भागवत पाटील यांचे आज दि. ७ रोजी दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज दि. ७ रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, नातू असा परिवार आहे. ते दीपक नारायण पाटील यांचे वडील तर स्वप्नील पृथ्वीराज नेमाडे, अंकुश पृथ्वीराज नेमाडे, ओम दीपक पाटील व ईशांत दीपक पाटील यांचे आजोबा होत.
ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व पाटील परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

कोणत्याही टिप्पण्या नाहीत