Contact Banner

महेंद्रशेठ घरत हे दिलेला शब्द पाळणारे नेते! उरण-पनवेल प्रीमियर लिगच्या आयोजकांचे मत; गौतमी पाटीलने आपल्या अदाकारीने रसिकांना जिंकले

 

mahendrasheth-gharat-keeps-his-word-uran-panvel-premier-league-organizers-opinion

महेंद्रशेठ घरत हे दिलेला शब्द पाळणारे नेते!

उरण-पनवेल प्रीमियर लिगच्या आयोजकांचे मत; गौतमी पाटीलने आपल्या अदाकारीने रसिकांना जिंकले


लेवाजगत


उरण | सुनिल ठाकूर

राधेय कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, चिर्ले आयोजित उरण-पनवेल प्रीमियर लिग स्पर्धेच्या अंतिम सामन्यास रविवारी (ता. २३) आंतरराष्ट्रीय कामगार नेते यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या हस्ते सुप्रसिद्ध नृत्यांगना यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात महेंद्रशेठ घरत आणि गौतमी पाटील यांचे जोरदार स्वागत केले.

यावेळी बोलताना महेंद्रशेठ घरत म्हणाले की, “मी कलेवर आणि कलाकारांवर प्रेम करणारा माणूस आहे. कलाकारांना प्रोत्साहन देणे हे माझे कर्तव्य मानतो. चिर्ले येथील तरुण ‘सुखकर्ता’ बंगल्यावर आले होते. त्यांनी उरण-पनवेल प्रीमियर लिगसाठी गौतमी पाटील यांना आणत असल्याचे सांगितले आणि प्रायोजकत्वाची विनंती केली. स्थानिक तरुणांची उदात्त भावना आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मी या स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले. क्रिकेटचा मी फक्त चाहता नाही, तर स्वतःही भरपूर क्रिकेट खेळतो.”

स्पर्धेच्या आयोजकांनीही महेंद्रशेठ घरत यांच्या शब्दपूर्तीचे कौतुक केले. “महेंद्रशेठ घरत यांनी दिलेला शब्द पाळला. शब्दाचा पक्का असा नेता राजकीय पटलावर क्वचितच पाहायला मिळतो,” अशा भावना आयोजकांनी व्यक्त केल्या.

उरण-पनवेल प्रीमियर लिगचे आयोजक दीपक पाटील, संतोष पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाल व सन्मानचिन्ह देऊन महेंद्रशेठ घरत यांचा सत्कार केला. यावेळी हजारो क्रिकेटप्रेमींनी “महेंद्रशेठ जिंदाबाद”च्या घोषणांनी मैदान दणाणून सोडले. परिसरातील अनेक मान्यवरही कार्यक्रमास उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.