Contact Banner

रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना ८ तास नियमित वीजपुरवठा द्या – आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

 

provide-8-hours-regular-electricity-to-farmers-raver-mla-amol-jawale-demand-cm-fadnavis


रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना ८ तास नियमित वीजपुरवठा द्या – आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी


लेवाजगत न्यूज  रावेर -रावेर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी पूर्वीप्रमाणे किमान ८ तास नियमित व अखंडित वीजपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

*रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना ८ तास नियमित वीजपुरवठा द्या – आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी >>* https://www.lewajagat.com/2026/05/provide-8-hours-regular-electricity-to-farmers-raver-mla-amol-jawale-demand-cm-fadnavis.html


रावेर मतदारसंघामध्ये केळी हे मुख्य पीक असून सध्या केळी पीक कापणीच्या टप्प्यावर आहे. तसेच मोठ्या प्रमाणात उन्हाळी लागवड देखील करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सुरळीत व पुरेसा विजपुरवठा होणे अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार जावळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.


सध्या कृषी पंपांसाठी मिळणारा वीजपुरवठा पूर्वीच्या ८ तासांवरून कमी करून ६ तास करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना आवश्यक पाणीपुरवठा करण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. वाढत्या तापमानामुळे केळी पिकाच्या उत्पादनावर व गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.


या पार्श्वभूमीवर रावेर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन कृषी पंपांसाठी तात्काळ पूर्वीप्रमाणे ८ तासांचा नियमित व अखंडित विजपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.