इटली दौऱ्यात मोदींकडून जॉर्जिया मेलोनींना ‘मेलडी’ चॉकलेट्स गिफ्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
इटली दौऱ्यात मोदींकडून जॉर्जिया मेलोनींना ‘मेलडी’ चॉकलेट्स गिफ्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
रोम : यांच्या इटली दौऱ्यादरम्यान त्यांनी इटलीच्या पंतप्रधान यांना ‘मेलडी’ चॉकलेट्सचा पुडा भेट दिल्याने सोशल मीडियावर या भेटीची जोरदार चर्चा रंगली आहे. जॉर्जिया मेलोनी यांनी स्वतः हा व्हिडीओ ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत “Thank you for the gift” असे कॅप्शन दिले आहे.
मंगळवारी पंतप्रधान मोदी इटलीची राजधानी रोम येथे दाखल झाले. यावेळी जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांचे स्वागत करत मोदींसोबत घेतलेला सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केला. “Welcome to Rome, my friend!” असे कॅप्शन देत मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. हा सेल्फी काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनीही मेलोनी यांच्यासोबतच्या भेटीबाबत पोस्ट शेअर केली. “रोममध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत रात्रीच्या जेवणाचा योग आला. त्यानंतर आम्ही प्रसिद्ध ला भेट दिली. विविध विषयांवर चर्चा झाली असून भारत-इटली मैत्री अधिक दृढ करण्यासाठी होणाऱ्या चर्चेसाठी मी उत्सुक आहे,” असे मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी मेलोनी यांच्यासोबत चर्चा करतानाचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. भारत आणि इटलीदरम्यान व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य या विषयांवर द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या दौऱ्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. “देश आर्थिक संकटात असताना पंतप्रधान इटलीमध्ये चॉकलेट्स वाटत आहेत. हे नेतृत्व नसून नौटंकी आहे,” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत