मुस्लिम कब्रस्तानातील केबल व साहित्य चोरी; सावदा पोलिसांत एनसीआर दाखल
मुस्लिम कब्रस्तानातील केबल व साहित्य चोरी; सावदा पोलिसांत एनसीआर दाखल
लेवाजगत न्यूज सावदा : शहरातील मस्कावद रोडवरील मुस्लिम कब्रस्तान परिसरातून ट्यूबवेलची केबल व इतर साहित्य चोरी झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून संबंधित चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत शेख कलीम शेख जलीस (वय ४९, रा. बांदणी चौक, सावदा ता. रावेर) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार हे मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, ८ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ९ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने कब्रस्तान परिसरातील ट्यूबवेलची सुमारे ५० फुट केबल वायर, तीन नळ्या व पाईप असा अंदाजे ४५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये एनसीआर क्रमांक ०२१७/२०२६ नोंद करण्यात आला आहे. तक्रारदारांना पुढील दाद संबंधित न्यायालयात मागण्याबाबत समज देण्यात आली आहे.
या घटनेचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सैय्यद असगर दादा, शेख कलीम शेख जलीस, सैय्यद अज़हर सैय्यद अख्तर, फिरोज खान कादर खान, गुलाम नबी शेख हमीद, आसिफ खान कुरैशी, इलयास खान, शेख कमरुद्दीन आणि सैय्यद अकील यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत