Contact Banner

ऋषिकेशला जाण्यासाठी नव्या पर्यायी गाडीची सोय हुबळी-ऋषिकेश विशेष आता नियमित; नव्या क्रमांकासह साप्ताहिक एक्स्प्रेस सेवा सुरू

 

new-alternative-train-service-to-rishikesh-hubli-rishikesh-weekly-express-regularized

ऋषिकेशला जाण्यासाठी नव्या पर्यायी गाडीची सोय

हुबळी-ऋषिकेश विशेष आता नियमित; नव्या क्रमांकासह साप्ताहिक एक्स्प्रेस सेवा सुरू

प्रतिनिधी | भुसावळ

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने हुबळी ते योग नगरी ऋषिकेश दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेगाडीचे नियमित साप्ताहिक एक्स्प्रेसमध्ये रूपांतर केले आहे. आतापर्यंत विशेष गाडी म्हणून धावणारी ०७३६३/०७३६४ ही रेल्वे आता नव्या क्रमांकांसह नियमित सेवा देणार आहे. त्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या पाच राज्यांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या नव्या नियमित एक्स्प्रेसला धारवाड, लोंडा, बेळगाव, घाटप्रभा, मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, हरदा, इटारसी, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ग्वाल्हेर, आग्रा कॅन्ट, मथुरा, हजरत निजामुद्दीन, गाझियाबाद, मेरठ सिटी, मुजफ्फरनगर, देवबंद, टपरी, रुडकी आणि हरिद्वार या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

या सेवेमुळे विशेषतः खान्देशातील प्रवाशांना हरिद्वार आणि ऋषिकेश येथे जाणे अधिक सोयीचे होणार आहे.

गाडीचे वेळापत्रक

  • गाडी क्र. १७३६३ (हुबळी – योग नगरी ऋषिकेश एक्स्प्रेस)
    ६ जुलै २०२६ पासून दर सोमवारी सायंकाळी ७.४५ वाजता हुबळी येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री ११.३० वाजता ऋषिकेश येथे पोहोचेल.

  • गाडी क्र. १७३६४ (योग नगरी ऋषिकेश – हुबळी एक्स्प्रेस)
    ९ जुलै २०२६ पासून दर गुरुवारी सकाळी ६.१५ वाजता ऋषिकेश येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता हुबळी येथे पोहोचेल.

दोन्ही दिशांनी या गाडीला भुसावळ स्थानकावर अधिकृत थांबा देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.